०४ डिसेंबर, २०११

शेवगाव तालुका मेडीकल असो. च्या अध्यक्षपदी डॉ.दहिफळेचापडगाव- शेवगाव तालुका मेडीकल असो. च्या अध्यक्षपदी चापडगाव येथील डॉ.अंबादास दहिफळे यांची निवड करण्यात आली. दहिफळे सध्या होमिओपॅथिक इंटीग्रेटेड मेडीकल प्रॅक्टीशनर्स असो. चे अध्यक्ष आहेत. ०२ नोव्हेंबर, २०११

सामनगाव सोसायटीत जगदंबा ची बाजी

सेवा संस्थेत सत्तापरिवर्तन  ; भैरवनाथ शेतकरी मंडळाचा पराभव
शेवगाव :ता.२ : तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या सामनगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अटीतटीच्या 
लढतीत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संदीप  सातपुते यांनी सत्तापरिवर्तन केले .यांच्या जगदंबा शेतकरी मंडळाने सर्वच्या 
सर्व १३ जागांवर निर्विवाद वर्चस्व मिळविले . कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत कापरे ,तालुकाध्यक्ष सुरेश कापरे व मनसेचे तालुका उपाध्यक्ष
सुदाम झाडे यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ शेतकरी मंडळाचा दारूण  पराभव झाला .
        सामनगाव आणि लोळेगावचे कार्यक्षेत्र असलेली हीसंस्था गेल्या ४० वर्षापासून कॉग्रेसच्या ताब्यात होती .
या निवडणुकीत सातपुते यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने सत्ताबदल घडून माजी आमदार राजीव राजळे यांच्या
  राष्ट्रवादी  कॉग्रेस मधील प्रवेशामुळे इकाकी पडलेल्या  कॉग्रेसला खुद तालुकाध्यक्षच्या  गावातपराभवाची धूळ चारली . विजयी उमेदवाराचे आमदार चंद्रशेखर घुले ,माजी आमदार नरेंद्र घुले ,जेष्ठ नेते दिलीप लांडे ,सभापती अरुण लांडे यांनी अभिनंदन केले कृषी उत्पन्न  बाजार  समितीचे   सभापतीबबनराव जगदाळे ,उपसभापती यादवराव क्षीरसागरयांनीविजयीउमेदवारांचा सत्कार केला.विजेयी झालेले उमेदवार 
असे : केलास कराळे,गणेश नजन,रघुनाथ झाडे , बाबासाहेब पांडव, रविंद्र सातपुते, बाबा शेख, हिरा झाडे ,
दीपक कळकुंबे,अशोक नजन, काकासाहेब काळे, अशोक उदागे, मंदा कांबळे, सुधाकर पठाडे, .
निवडणूक निर्णयअधिकारी राजेंद्र जहागीरदार यांनी  तर सहायक म्हणून सचिव बाबासाहेब गवारे यांनी काम
 पहिले .
असाही उपक्रम =निवडणूक निकालानंतर हारतुरे , गुलालाची उधळण आणि डीजेला फाटा देऊन सर्व उमेदवारांनी 

शेवगाव: सामनगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेमध्ये सत्तापरिवर्तन घडविना-या राष्ट्रवादी  कॉग्रेसच्या
संदीप सातपुते यांचा बाजार समितीच्या वतीने सत्कार करतांना बबनराव जगदाळे ,
 उपसभापती यादवराव क्षीरसागर, बापू गवळी  दत्तात्रेय नवघरे आदी .

ग्रामदेवत जगदंबा मंदिराच्या बांधकामासाठी प्रत्येकी एक हजारप्रमाणे १३ हजारांचा निधी मंदिराच्या विश्वस्ताकडे  स्वाधीन केला

११ ऑक्टोबर, २०११


हिंदु -मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेल्या बन्नोमा यात्रेस प्रारंभ

 बोधेगाव.[गणपत दसपुते] शेवगाव तालुक्याच्या  पूर्वभागातील ३५ गावामधील  हिंदुमुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेल्या श्रीसाध्वी  बंनोमा यात्रेस बुधवार दि १२ पासून प्रारंभ होतआहे .त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची  माहिती यात्रा कमेटीच्यावतीने  देण्यात आली    
बुधवारी संदल निघणार असून रात्री गोदावरीच्या पाण्याने बंनोमाच्या समाधीस जलस्नान घालून यात्रेस प्रारंभ होणार आहे . गुरुवारी  छबिना निघणार असून यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार आहे याच दिवशी राज्यातील नामांकित ५ ते ६ तमाशा फडाच्या  जुगलबंदी चा  कार्यक्रम हि पाहायला मिळणार आहे .
                    दरम्यान यात्रेच्या मुख्य दिवशी शुक्रवारी कुस्त्यांचा जंगी हंगामा होणार आहे .या हगाम्यात राज्यातील हिंदकेसरी महाराष्ट्रकेसरीसह  नामांकित मल्ल हजेरी लावत असतात तसेच शनिवारी बन्नोमा चरणी विविध कलाकाराच्या हजेर्याचा कार्यक्रम होणार आहे .
                                                   या वर्षी पाऊस चांगला झाल्याने यात्रेला किमान ५ ते ६ लाख उपस्थित राहतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे .यात्रा काळात अवैध धंद्यांना पूर्णपने  बंदी घालण्यात आली आहे .भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ४० ते ५० पोलिसांचा फौज फाटा तैनात करणार असल्याची माहिती शेवगावंचे पोलिसनिरीक्षक माने यांनी दिली .दरम्यान जिल्हा पोलीस अधिक्षक कृष्णप्रकाश भेट देणार असल्याचे समजते .
 [ छाया -अन्वर मणियार बोधेगाव]

बोधेगाव बन्नोमा यात्रा २०११

बोधेगाव बन्नोमा यात्रा २०११ 
१२ ऑक्टोंबर -संदल 
१३ ऑक्टोंबर -छबिना
१४ ऑक्टोंबर हगामा 
१५ ऑक्टोंबर हजेर्या 

 बोधेगाव न्यूज तर्फे  सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत

(छाया-अन्वर मणियार बोधेगाव )

०५ सप्टेंबर, २०११

शेवगाव "गणेश दर्शन"

जयहिंद युवा मंडळ वरूर रोड येथील मंडळाने श्री.कृष्ण वेशभूषेतील गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.

गजराज प्रतिष्ठान जुना बाजार तळ यांनी चांदीची गणेश प्रतिष्ठापना केली आहे.
संकल्प प्रतिष्ठान आंबेडकर चौक यांनी सिंहासनारूढ ८ फुटाची गणपतीची मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.


शेवगाव "गणेश दर्शन"


चंद्रशेखर आझाद मित्र मंडळ खंडोबा नगर ने पिंपळाच्या पानावर आरूढ असलेली मूर्ती बसवली आहे.
जाणता राजा प्रतिष्ठान, आंबेडकर चौक ने " लालबागचा राजा " ची  आठ फुट उंचीची मूर्ती बसवली आहे. शिव छत्रपती मंडळ, माळी गल्ली ने राम भक्त हनुमाने उचललेली गणेशाची आगळी वेगळी मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. 

 क्रांती युवा ग्रुप क्रांती चौकने  " लालबागचा राजा " ची  नऊ फुट उंचीची मूर्ती बसवली आहे. 


२३ ऑगस्ट, २०११

शेवगाव तालुक्यातील अनेक गावांना अतिवृष्टीने झोडपले

शेवगाव, ता.२३: तालुक्यातील सामनगाव, वडुले,वरूर,भगूर ,खरडगाव, सालवडगाव, आखेगाव,थाटे,धावनवाडी,दहिगाव-ने,भागाला रात्री अतिवृष्टीने चांगलेच झोडपले ओढ्या-नाल्यांना पूर आल्याने अनेकांच्या घरात पाणी घुसले खते,धान्याची पोती भिजली,भिंती कोसळल्या,काहींचे संसार कांदा चाळीतील कांदा वाहून गेला.मातीचे दोन बंधारे व एक सिमेंटचे बंधारे फुटले.विजेचे खांब पडले.एक सुमो गाडी वाहून गेली. पाचशे हेक्टर कपाशी व अन्य पिके जलमय झाल्याने मोठी हानी झाली आहे.

सामनगाव ता शेवगाव : अतिवृष्टीमूळे प्राथमिक शाळेच्या आवारात पाणीच-पाणी झाले

सामनगाव ता शेवगाव : अतिवृष्टीमूळे कपाशी जलमय झाली

वाडगाव येथे सिमेंट बंधारा फुटल्याने पिकांचे झालेले नुकसान
आखेगाव ता शेवगाव: नुकसानीची पाहणी करताना तहसिलदार नितीन पाटील, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब पायघन,सभापती अरुण लांडे, केदारेश्वर चे उपाध्यक्ष- माधव काटे आदी
आखेगाव येथील खडकी नाल्यात वाहून आलेली सुमो गाडी

 
 तहसिलदार नितीन पाटील, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब पायघन यांनी तातडीने सर्व भागाची पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.सभापती अरुण लांडे, केदारेश्वर चे उपाध्यक्ष- माधव काटे,यांनीही नागरिकांना भेटून दिलासा दिला. आ. चंद्रशेखर घुले सातत्याने यासबंधीचा आढावा घेत आहेत. गेल्या अनेक दिवसात पाउस नसल्याने लोक बेसावध होते. त्यामुळे अधिक नुकसान झाले.

२२ ऑगस्ट, २०११

शेवगाव न्यूजचे वाचक विविध देशात...


शेवगाव तालुक्याचे सुपुत्र आज शिक्षण, नोकरी, उद्योग, व्यवसाय निमित्त जगाच्या कान्याकोप-यात वावरत असतांनाही तालुक्यातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी देत आहेत  शेवगाव न्यूज या ब्लॉगला भेट.

२० ऑगस्ट, २०११

मा. अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल विधेयकाला शेवगाव तालुक्यातील विविध संघटनाचा तीस-या दिवशी वाढता पाठिबा

शेवगाव येथे जनशक्ती  मंच व आबासाहेब काकडे हायस्कूल ने अण्णा हजारे यांना  पाठिबा देण्यासाठी भव्य मोर्च्या चे आयोजन करण्यात आले

शेवगाव येथे जनशक्ती  मंच व आबासाहेब काकडे हायस्कूल ने अण्णा हजारे यांना  पाठिबा देण्यासाठी भव्य मोर्च्या चे आयोजन करण्यात आले

शेवगाव येथील क्रांती चौंका मध्ये रस्ता रोको करून आपले विचार माडताना अण्णा ह्जारेचे कार्यकर्ते

शेवगाव येथील क्रांती चौंका मध्ये सरकारच्या प्रतीकात्मक पुतुळ्याचे दहन करताना कार्यकर्ते

शेवगाव येथे भाजपा, शिवसेना, मनसे यांनी अण्णा हजारे यांना  पाठिबा देण्यासाठी   पोलीस स्टेशन येथे येऊन स्वतःला अटक करून घेतली

शेवगाव येथे चालक मालक संघटनेच्या वतीने अण्णा हजारे यांना  पाठिबा देण्यासाठी मोर्च्या काढून निषेध व्यक्त केला


आखेगाव ता. शेवगाव येथील महिलांनी अण्णा हजारे यांना  पाठिबा देण्यासाठी शेवगाव येथे मोर्च्या काढून नायब तहसीलदार यांना निवेदन दिले 


 

देवटाकळी ता. शेवगाव येथील तरुणांनी अण्णा हजारे यांना  पाठिबा देण्यासाठी पोलीस स्टेशन समोर मुंडण करून आगळे-वेगळे आंदोलन केले

आखेगाव ता. शेवगाव येथील महिलांनी अण्णा हजारे यांना पाठिबा देण्यासाठी शेवगाव येथे मोर्च्या काढून नायब तहसीलदार यांना निवेदन दिले

शेवगाव येथे लहान मुलांनी अण्णा हजारे यांना  पाठिबा देण्यासाठी  प्रत्येंक  गल्ली पिंजून काढली

बोधेगाव येथील डॉक्टर हर्षल अंधारे. यांना सिंगापूर येथे उत्कृष्ठ वैदेकीय सेवेसाठी पुरस्कार प्रदान केला
बोधेगाव येथील  डॉक्टर हर्षल अंधारे यांना त्यांनी दिलेलेल्या  उत्कृष्ठ  वैद्यकीय सेवा तसेच  हृदयरोग या विषयात त्यांनी केलेले  विशेष संशोधनासाठी  देण्यात  आला.
हा पुरस्कार त्यांना  चांगी जनरल  हॉस्पिटल चे प्रमुख श्री उदय राम यांनी प्रदान केला.  
डॉक्टर हर्षल  हे सद्या  सिंगापुर मध्ये हृदयरोग  या विषयामध्ये उच्च शिक्षण घेत याहेत. ह्या पुरस्काराने सन्मानित होणारे ते पहिले भारतीय आहेत.  डॉक्टर हर्षल आपल्या  पुढील अभ्यासा करण्या करिता अमिरेकेला जाणार  आहेत.  पुढील वाटचालीस शेवगाव तालुका आणि शेवगाव न्यूज च्या मन :पूर्वक शुभेच्छा !
   

१९ ऑगस्ट, २०११

सतत दुष्काळी परिस्थितीशी संघर्ष करणा-या शेवगाव तालुक्याचे हरित क्रांतीचे स्वप्न प्रत्यक्ष साकार होईल - जल-संपदा मंत्री सुनील तटकरे

शेवगाव, ता.१९: पश्चिम वाहीने मोठ्या नद्याचे पाणी अडवून वळविले तर सतत दुष्काळी परिस्थितीशी संघर्ष करणा-या अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी, नेवासा तालुका व नजीकच्या मराठवाड्यासहित २० ते २२ टी. एम. सी पाणी उपलब्ध होऊन सिचन क्षेत्रात मोठी वाढ होईल व
हरित क्रांतीचे स्वप्न प्रत्यक्ष साकार होईल. शेतकर्यांच्या आर्थिक उन्नतीची हि योजना शासनाच्या विचाराधीन असल्याचे प्रतिपादन राज्याचे जल-संपदा मंत्री सुनील त�9A्या आध्यक्षतेखाली, जिल्ह्याचे पालक मंत्री बबनराव पाचपुते, आ. चंद्रशेखर घुले पाटील, खा.दिलीपजी गांधी, घनशाम शेलार, पांड0��नील तटकरे यांच्या हस्ते व योजनेचे जनक माजी आ. नरेंद्र घुले पाटील यांच्या आध्यक्षतेखाली, जिल्ह्याचे पालक मंत्री बबनराव पाचपुते, आ. चंद्रशेखर घुले पाटील, खा.दिलीपजी गांधी, घनशाम शेलार, पांडुरंग अभंग, देसाई देशमुख, शारदा लगड; सोमनाथ धूत, बाळासाहेब सोनवणे आदीच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
आपल्या भाषणात तटकरे पुढे म्हणाले कि, जायकवाडी धरणाच्या निर्मितीसाठी शेवगाव तालुक्यातील शेतकर्यांनी आपली कसदार सुपीक जमीन देऊन मोठा त्याग केला आहे त्यामुळे जायकवाडी धरणाच्या पाण्यावर धरणग्रस्त शेवगाव परिसराचा हक्क आहे.त्यामुळे ताजनापूर उपसा सिंचन योजनेच्या दुस-या टप्प्यात सुमारे ३९५ कोटी रु. खर्च्राच्या ६ हजार ९६० हे. जमीन क्षेत्र सिंचनाखाली येणा-या सुमारे २० गावातील १० हजार पर्यंत लाभधारक शेतक-याच्या शेतात बंद पाईप द्वारे व ठिबक सिंचन पद्धतीने पाणी पुरवठा करणारा देशातील हा पहिला प्रकल्प देशाचे कृषी मंत्री शरद पवार व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घुले बंधूच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मंजूर केला असून हा पथदर्शी प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत २०१३ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली . तसेच शेवगाव तालुक्यातील ३ व पाथर्डी तालुक्यातील २ अशा ५ बंधा-यासाठी सुमारे १३ कोटी रु. व जायकवाडी चा-याच्या दुरुस्तीतीसाठी १ कोटी रु. तसेच समांतर कालवा साव्ह्रेक्षणासाठी सुमारे ५ कोटी रु. रक्कम शासनाच्या स्तरावरून उपलब्ध केल्याचे यावेळी जाहीर केले.
ताजनपुर योजनेच्या दुसर्या टप्प्यात पूर्वी तालुक्यातील १७ गावांचा समावेश होता. आता मंगरूळ बु. व खुर्द व आंतर्वली बुद्रुक या ३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. आमदार चंद्रशेखर घुले यांनी प्रास्ताविकात तालुक्याचे स्वप्न अजित पवार व सुनील तटकरे यांच्या सहकर्यातून पूर्ण होत
असल्याचा आनंद व्यक्त केला. माजी आमदार नरेंद्र घुले, पालकमंत्री बबनराव पाचपुते, कार्यकारी संचालक कंदरफळे , दिलीप लांडे, काकासाहेब नरवडे यांची भाषणे झाली. कार्यक्रमास अरुण लांडे, अण्णासाहेब धस, बबन जगदाळे यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
सूत्रसंचालन भाऊसाहेब सावंत यांनी तर आभार दिलीप फलके यांनी केले.
video